पान-३ ॲंकर
NSK26H33325
पिंपळगाव बसवंत : क. का. वाघ महाविद्यालयात ‘जागर आरोग्याचा- मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. अरुण गचाले. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, डॉ. ज्ञानेश्वर सातभाई, डॉ. साहेबराव मोरे, प्रा. भगवान कडलग, डॉ. संदीप माळी, डॉ. छाया भोज आणि प्रा. उत्तम जाधव आदी.
--------
व्यायाम, संतुलित आहाराचा अंगीकार करा
--------------
डॉ. अरुण गचाले : पिंपळगाव महाविद्यालयात ‘जागर आरोग्याचा’ उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.२३ : धावपळीच्या सध्याच्या जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. साखर व मैद्याचे सेवन कमी करून पौष्टिक आहार घ्यावा, ऋतुमानानुसार फळांचे सेवन करावे आणि मोबाइलच्या अतिवापरापासून दूर राहावे, असा आरोग्यविषयक संदेश बालरोग तज्ज्ञ डॉ. अरुण गचाले यांनी दिला.
मविप्र समाज संस्थेच्या येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर आरोग्याचा- मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे होते. व्यासपीठावर सत्रप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर सातभाई, डॉ. साहेबराव मोरे, प्रमुख वक्त्या प्रा. सारिका दौंड, प्रा. भगवान कडलग, डॉ. संदीप माळी, डॉ. छाया भोज आणि प्रा. उत्तम जाधव आदी उपस्थित होते.
डॉ. गचाले यांनी निरोगी जीवनासाठी साखर व मैद्याचे पदार्थ कमी खाऊन ज्वारी, बाजरी, नाचणी, फळे आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करताना, ‘फिटनेस विकत घेता येत नाही; त्यासाठी स्वतः मेहनत घ्यावी लागते,’ असे त्यांनी सांगितले.
डॉ. संदीप माळी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विठ्ठल जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. उत्तम जाधव यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची शपथ दिली. प्राचार्य डॉ. व्ही. बी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. डॉ. छाया भोज यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्ञानेश्वर सातभाई यांनी आभार मानले.
----------
चौकट
प्रा. सारिका दौंड : NSK26H33326
मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी
निफाड महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातील प्रा. सारिका दौंड यांनी मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी मनातील भावना दडपून न ठेवता मोकळेपणाने व्यक्त कराव्यात. आपल्या समस्या पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तींशी बोलून दाखवाव्यात आणि गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
----------