Nashik News : सिन्नरच्या उत्कर्षाचे भगीरथ : (कै.) सूर्यभान तथा नानासाहेब गडाख

अवर्षणग्रस्त असलेल्या सिन्नर तालुक्याला वैभव संपन्नेतेच्या मार्गावर नेऊन ठेवण्याचे भगीरथ कार्य नानासाहेबांनी केले. विकासगंगेच्या भगीरथाच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश...
late Suryabhan aka Nanasaheb Gadakh
late Suryabhan aka Nanasaheb Gadakhesakal

सिन्नर तालुक्याला जगाच्या नकाशावर आणण्याचे कार्य (कै.) सूर्यभानजी तथा नानासाहेब गडाख यांनी केले. खेड्यापाड्यात शिक्षणाची ज्ञानगंगा पोचविण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या माध्यमिक लोकशिक्षण मंडळातर्फे त्यांच्या जयंतीचा पंधरवडा ‘उत्कर्ष दिन’ म्हणून साजरा होत आहे.

अवर्षणग्रस्त असलेल्या सिन्नर तालुक्याला वैभव संपन्नेतेच्या मार्गावर नेऊन ठेवण्याचे भगीरथ कार्य नानासाहेबांनी केले. विकासगंगेच्या भगीरथाच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश... (pioneer of Sinnar Utkarsha late Suryabhan aka Nanasaheb Gadakh Nashik News)

घरची परिस्थिती बेताचीच. अनेक अडचणींचा सामना करीत असताना १६ व्या वर्षी त्यांचे मातापित्यांचे छत्र हरपले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कसेबसे सातवीपर्यंत गावातच झाले. पुढे सामाजिक कार्यात झोकून दिले.

१९५२ मध्ये भूमिहीनांना शासनाने जमीन द्यावी, यासाठी दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अनेक आंदोलनामुळे त्यांना तुंरुगवास भोगावा लागला.

मात्र, त्यांचे नेतृत्व विकसित होत गेले. ते लोकमान्य झाल्याने जनतेने त्यांना राजकारणाची शिडी चढण्यास भाग पाडले. अंगी नेतृत्वगुण असल्यामुळे जिल्हा लोकल बोर्ड व जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यांनी लढवल्या.

१९६२, १९६७, १९७२ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकल्यामुळे त्यांना सलग १५ वर्ष सभापती होण्याची संधी मिळाली.

दुष्काळमुक्तीसाठी त्यांनी ‘पाझर तलाव’ बांधण्यावर भर दिला. छोटे-मोठे ३०० पाझर तलावांचे काम त्यांनी केले. त्यातून शेतीचे सिंचन वाढले. दुष्काळात त्यांनी रस्ते बांधणे, नाला बांधणे, जमीन सपाटीकरण, बांधबंदिस्ती यासारखी कामे केली.

१९७२ मध्ये भीषण दुष्काळ पडला. जनता अन्नपायी आक्रोश करू लागली. जनतेच्या आक्रोशाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३५ हजार जनसमुदायाचा धडक मोर्चा त्यांनी काढला. भोजापूर धरणाचे तालुक्यातील शेतीला १०० टक्के पाणी मिळावे, यासाठी आंदोलन केले.

late Suryabhan aka Nanasaheb Gadakh
Nashik Grapes Export : द्राक्षपंढरीतून 20 हजार टनाने अधिकची निर्यात

विहिरी कोरड्याठाक असल्याने विहिरीतील वीजपंपाचे मीटर हटविण्यासाठी त्यांनी मोर्चा काढला. त्यातून शासनाने संपूर्ण राज्यातील मीटर काढले. १९६४ मध्ये माध्यमिक लोकशिक्षण मंडळाची स्थापना केली.

देवपूर, पंचाळे, शहा, मुसळगाव, पाथरे येथे विद्यालये सुरू केली. इंग्रजी माध्यमाचे एस. जी. पब्लिक स्कूल सिन्नरमध्ये सुरू केले. संस्थेत इडोकॉम या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीसोबत करार करून ई-लर्निग प्रणाली एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये राबविली.

त्यांनी उपसा जलसिंचन योजना सहकारी तत्वावर सुरू केल्या. कडवा, सरदवाडी व कोनांबे ही धरणे बांधून त्यांनी सिन्नरची शेती हिरवीगार केली. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले.

ते दोन वेळेस आमदार झाले. रोजगार हमी योजनेतून त्यांनी इगतपुरी तालुक्यातील कडवा नदीवर धरण बांधले. या धरणाचे आवर्तन कालव्याद्वारे तालुक्याला मिळत आहे. त्याचा निफाड तालुक्यातील गावांनाही फायदा झाला.

सहकारी तत्वावरील औद्योगिक वसाहत त्यांनी उभी केली. रोजगार वाढल्याने सिन्नर शहराचा झपाट्याने विकास होऊ लागला. तालुक्याच्या शेतीला पाणी व तरुणांच्या हाताला औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून काम देण्याचे काम नानांनी केलेच.

तालुक्याच्या विकासासाठी चौफेर काम केले. खऱ्या अर्थाने तालुका उत्कर्षाच्या मार्गावर त्यांनी आणला.

शब्दांकन : शिक्षक नानासाहेब खुळे

late Suryabhan aka Nanasaheb Gadakh
PM Modi Nashik Visit : पंतप्रधान मोदी करणार गोदाघाटाची पाहणी : गिरीश महाजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com