नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे शनिवारी ''पितरांचा महोत्सव

नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे शनिवारी ''पितरांचा महोत्सव
Published on: 
नसती उठाठेव परिवारातर्फे उद्या पितरांचा महोत्सव सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : गंगापूर रोडवरील नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवारी (ता.१०) पितरांच्या स्मरणार्थ पितरांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे विसावे वर्ष असल्याचे आयोजक बापू कोतवाल यांनी सांगितले. उपक्रमात धान्य दान हा उपक्रम राबविला जातो. पितरांना आपण घरात जेवू घालतो पण समाजात उपाशी व गरजू अशा गरिबांसाठी मंडळातर्फे दरवर्षी धान्य संकलन करण्यात येते. पितरांचा महोत्सव शनिवारी गंगापूर रोडवरील नरसिंहनगर येथील श्री हनुमान मंदिर येथे सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत समाजातील दानशूर व्यक्तींकडून स्वच्छेने धन्य अथवा पैसे स्वीकारण्यात येतील. याप्रसंगी ओमप्रकाश कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून ते सर्वपित्री अमावस्येवर मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात सामूहिक पद्धतीने वैयक्तिक दान संकल्प गुरुजी करून घेतील. दान संकल्प व तर्पणासह मंत्र पठणाची वेळ दुपारी बाराची असेल. उपक्रमात जमा झालेले धान्य व इतर उपयोगी किराणा सामान हे सर्व, मंडळातर्फे साधारणपणे वृद्धाश्रम, मुलामुलींच्या आश्रम शाळा, अंधशाळा, आजारी व विकलांग व्यक्तींचा संभाळ करणाऱ्या सेवाभावी संस्था, की ज्यांना सरकारी अनुदान मिळत नाही अथवा गरजेपेक्षा अत्यंत कमी अनुदान मिळते आणि ज्या संस्था नाशिक परिसरात कार्यरत आहेत अशा संस्थांची निवड केली जाते. उपक्रम यशस्वितेसाठी मंडळाचे कार्यकर्ते बापू कोतवाल, दिलीप कुलकर्णी, सुनील अहिरे, सुनील नाखरे, मंदार वडगावकर, विजय बच्छाव, अरुण कुलकर्णी, अनंत मोहिदेकर, रवी जोशी, प्रशांत काटकर आदी प्रयत्नशील आहेत. -----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com