Prakash Londhe
sakal
नाशिक: सातपूर परिसरातील कुख्यात पीएल ग्रुपचा म्होरक्या व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याच्या टोळीविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत लोंढे याच्या मालमत्तेची चौकशी केली जाईल. या टोळीविरोधात खंडणीसह जमीन बळकावणे, हप्ता वसुली, घातक हत्यारांचा अनधिकृतरीत्या वापर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.