मालेगाव- तालुक्यातील लोणवाडे शिवारातील तीन प्लॅस्टिक कारखाने महसूल प्रशासनाने बुधवारी (ता. २३) सील केले. या कारवाईमुळे प्लॅस्टिक कारखानदारांचे धाबे दणाणले आहे.शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कारखाने आहेत. प्लॅस्टिक उद्योगामुळे पर्यावरण धोक्यात येत आहे. लोणवाडे शिवारात जवळपास १५ प्लॅस्टिक कारखाने आहेत. लोणवाडे ग्रामपंचायतीने सदर कारखान्यांपासून पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रार करत ते बंद करण्याची मागणी प्रांताधिकारी नितीन सदगीर यांच्याकडे केली होती.