सर्जरीविषयक विशेष पुस्तिकेचे प्रकाशन

सर्जरीविषयक विशेष पुस्तिकेचे प्रकाशन
Published on: 
फोटो : H33402 नाशिक : ‘अशोका मेडिकव्हर’मध्ये सर्जरीविषयक पुस्तिकेचे प्रकाशन करताना मान्यवर. ‘अशोका मेडिकव्हर’मध्ये सर्जरीविषयक पुस्तिकेचे प्रकाशन नाशिक, ता. २३ : प्लॅस्टिक सर्जरी ही केवळ सौंदर्यवर्धनापुरती मर्यादित नसून अपघात, भाजलेल्या जखमा, जन्मजात विकृती, हाताच्या गंभीर दुखापती आणि शरीराच्या विविध भागांची रचना व कार्यक्षमता पुन्हा सुधारण्यासाठी महत्त्वाची वैद्यकीय शाखा आहे. या उपचारांविषयी रुग्णांना आणि सर्वसामान्यांना उपयुक्त माहिती मिळावी, या उद्देशाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये प्लॅस्टिक, कॉस्मेटिक, हँड आणि ट्रॉमा सर्जरीविषयक विशेष पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व कन्सल्टंट प्लास्टिक, कॉस्मेटिक, हॅन्ड ॲन्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. प्रणीत डी. मानकरे यांनी केले. डॉ. प्रणीत मानकरे यांनी सांगितले की, पुस्तिकेद्वारे रुग्णांना उपलब्ध उपचार, आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रे आणि वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व समजण्यास मदत होईल. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अमोल भालेकर यांनी सांगितले की, डायबेटिक फूट आणि दीर्घकाळ न भरणाऱ्या जखमांमध्ये रक्तपुरवठ्याची स्थिती तपासणे महत्त्वाचे असते. विविध तज्ज्ञांच्या समन्वयातून रुग्णांना सर्वसमावेशक उपचार देणे हा या दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग आहे. सेंटर हेड अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की, प्लास्टिक, हॅन्ड आणि ट्रॉमा सर्जरीविषयक ही पुस्तिका रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यक्तींसाठी उपयुक्त ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com