राज्य नाट्य स्पर्धा : नाशिकच्या लेखकांच्या नाटकांनी सोलापूर केंद्रावर मारली बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

theater

नाशिकच्या लेखकांच्या नाटकांनी सोलापूर केंद्रावर मारली बाजी

नाशिक : कोरोनामुळे (Corona) दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ६०वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा (Rajya Natya Spardha) सुरु झाली. या स्पर्धेत सोलापूर केंद्रात नाशिकच्या लेखकांनी लिहीलेल्या नाटकांनी बाजी मारली आहे. आदिल शेख लिखीत ‘पाऊस पाड्या’ आणि अपर्णा क्षेमकल्याणी लिखीत ‘डोंगरार्त’ या दोन्ही नाटकांनी सोलापूर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत बाजी मारली असून त्यांची स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

नाशिकमधील कलावंतामध्ये उत्साह

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून लांबणीवर पडलेली ६०वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा सुरु २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली. संपुर्ण महाराष्ट्रातील रंगकर्मींच्या आनंदाला उधाण आले. राज्यातील १९ केंद्रांवर स्पर्धा जल्लोषात पार पडत असून एक वेगळा आनंद अन् चैतन्य सर्व नाट्य कलावंतांमध्ये संचारले आहे. यात नाशिकच्या लेखकांनी लिहीलेली नाटक सोलापूर केंद्रावर सादर होत त्यांनी विजयश्री पटकावल्याने नाशिकमधील कलावंतामध्ये आनंदाच वातवरण आहे.

हेही वाचा: लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी राज्यसरकारकडून 100 कोटी

''२०१५ ला ‘पाऊसपाड्या’ हे नाटक लिहायला घेतल. तब्बल एक वर्ष एव्हढा कालावधी नाटक लिहीण्यासाठी लागला मात्र व्यक्तीत्वाच्या समस्यांवर भाष्य करणार कथानक असल्याने त्याची बांधणीही तितकीच जबाबदारीने केली. आणि आज त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय येतोय.'' - आदील शेख, लेखक- ‘पाऊसपाड्या’

''बाईच्या जगण्याची ही कथा आहे. २०१८ ला हे नाटक लिहीण्याचा विचार केला आणि अवघ्या ३ ते ४ दिवसात याच लिखाण पुर्ण केले. हतबल, हलाखीच जिवन जगणाऱ्या स्त्रीच्या आयुष्याशी निगडीत हा विषय असल्याने लिखाणाचा अनुभव फार वेगळा होता. या नाटकात अभिनय करणाऱ्या कलावंतासोबतच प्रेक्षकांनाही एक अविस्मरणीय असा अनुभव येतो.'' - अपर्णा क्षेमकल्याणी, लेखिका -‘डोंगरार्त’

हेही वाचा: राज्य नाट्य स्पर्धा : हौशी कलावंतांना व्यावसायिक नाटकाचे दर

Web Title: Plays By Nashik Writers Won At Solapur Center Rajya Natya Spardha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
go to top