मालेगांव तालुक्यातील गावांना दोन वर्षात १७ हजात ७५४ घरकुले मंजूर

मालेगांव तालुक्यातील गावांना दोन वर्षात १७ हजात ७५४ घरकुले मंजूर
Published on: 
मेन फिचर दोन वर्षांत १७ हजार ७५४ घरकुलांना मंजुरी ६ हजार २५ घरकुलांचे काम पूर्ण; ५ हजार ९६५ कामे बंद विनोद चंदन : सकाळ वृत्तसेवा मालेगाव कॅम्प, ता. १५ : मालेगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दोन वर्षांत १७ हजार ७५४ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ६ हजार २५ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर ५ हजार ७६४ घरकुलांचे प्लिंथ व लेंटरचे काम सुरू आहे. मात्र, ५ हजार ९६५ घरकुलांची कामे बंद असल्याची माहिती पंचायत समितीच्या घरकुल विभागाने दिली. तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात २०२४-२५ ते २०२५-२६ या कालावधीत ही मंजुरी देण्यात आली. दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही शासनाच्या अनुदानातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होत आहे. योजनेतील लाभार्थ्यांना आतापर्यंत दोन हप्ते देण्यात आले आहेत. २ हजार ४२७ लाभार्थ्यांना तिसरा हप्ताही मिळाला आहे. शासनाच्या अनुदानासोबत स्वतःची जमापुंजी वापरून अनेक लाभार्थी घरांची कामे पूर्ण करीत आहेत. काही ठिकाणी स्थानिक कारागिरांकडून कामे करून घेतली जात आहेत. नवीन घरकुलांसाठी २२ हजार ६९८ लाभार्थ्यांनी ग्रामस्तरावर स्वयं-सर्वेक्षण केले आहे. या घरकुलांना अद्याप शासनाची मंजुरी मिळालेली नाही. ग्रामसभेत ठराव मंजूर करून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाणार आहे. दोनशे घरकुलांची मंजूर दाभाडी, अजंग,वडेल, निमगाव,रावळगाव, टेहरे, सोनज, चिंचगव्हाण, राजमाने, टोकडे, कुकाणे ,करजगव्हाण, दहिदी, काष्टी,आघार बुद्रुक, तळवाडे, जळगाव निं. ५ ते २० घरकुलांची गावे वनपट, कंधाने, निळगव्हान,कौळाने गा., खलाने, मालनगाव ----- तालुक्याला मिळालेले अनुदान लाभार्थ्याला वितरित अनुदान पहिला हप्ता : ८ कोटी ५५ लाख रुपये पहिला टप्पा - १५००० दुसरा हप्ता : २२ कोटी १७ लाख ५० हजार दुसरा टप्पा - ७०,००० तिसरा हप्ता : ५१ कोटी ४९ लाख ९५ हजार तिसरा टप्पा- ३०''००० चौथा हप्ता : १ कोटी ९५ लाख ३५ हजार चौथा टप्पा - ५००० वाढीव अनुदान - ५०,००० ३५ हजार बांधकामासाठी १५००० सोलर अनुदान
Marathi News Esakal
www.esakal.com