नाशिक- केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर निधी अर्थात पीएम स्वनिधी योजनेतून लाखो फेरीवाल्यांना स्वावलंबी होण्याचे संधी मिळाली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या योजनेचे ऑनलाइन पोर्टल बंद असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे प्रकरण अडकून पडले आहेत. त्यामुळे ते त्वरित सुरू करावे, अशी मागणी श्रमशक्ती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी केली आहे.