धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H34811
धुळे : देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर.
---
पोक्सो, सोशल मिडिया वापरावर
मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
---
देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ९ : श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला अंतर्गत तक्रार निवारण समिती व उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सुरक्षित बचपन अभियानांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या वतीने पोक्सो व अन्य संबंधित स्त्री संरक्षण विषयक कायदे व सायबर क्राईमवर जगजागृती कार्यक्रम नुकताच झाला.
या कार्यक्रमाला अति. सत्र न्यायाधीश ए. ए. भोसले, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एम. जी. सराफ, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी, ॲड. श्रीमती बी. एस. वाघ, प्राचार्य प्रा. डॉ. हितेंद्र पाटील, ॲप्लाइड सायन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. अभिजित मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात न्या. भोसले यांनी सोशल मिडियाचा वापर व वाढती सायबर गुन्हेगारी यावर मार्गदर्शन केले. ॲड. श्रीमती वाघ यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करून सोशल मिडियाचा माफक वापर करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष देण्याचे आवाहन करताना सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीपासून स्वतः ला दूर ठेवण्याचे आवाहन केले. न्या. सराफ यांनी पोक्सो कायदा, त्यातील तरतुदी, विद्यार्थ्यांनी या संदर्भात घ्यायची काळजी, सोशल मिडिया वापरताना घ्यायची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
न्या. कुलकर्णी यांनी बाललैंगिक गुन्हेगारी, नालसा, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाद्वारे दिला जाणारे मोफत कायदेविषयक सहकार्य यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, प्रारंभी प्राचार्य डॉ. पाटील यांनी अतिथींचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या महिला अंतर्गत तक्रार निवारण समिती समन्वयक प्रा. मेधा जोशी, सचिव प्रा. डॉ. संगीता राजपूत उपस्थित होते. प्रा. दीपमाला पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
---