जम्बोचा आयुर्वेदिक साहसी प्रवासने पोदार प्रेपचे स्नेहसंमेलन रंगले

जम्बोचा आयुर्वेदिक साहसी प्रवासने पोदार प्रेपचे स्नेहसंमेलन रंगले
Published on: 
जागेनुसार वापरावी ‘पोदार प्रेप’चे स्नेहसंमेलन; नृत्य, नाट्याचे सादरीकरण जळगाव, ता. ६ : पोदार प्रेपच्या १७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी जम्बोचा आयुर्वेदिक साहसी प्रवास’ या संकल्पनेवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात बुधवारी (ता. ४) उत्साहात झालेल्या या सोहळ्यात भारतीय आयुर्वेद परंपरा, योग, आरोग्यदायी सवयी आणि निसर्गाशी असलेले नाते यांचे महत्त्व चिमुकल्यांनी कलात्मक पद्धतीने उलगडले. स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. चंचल शाह उपस्थित होत्या. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या रचना चव्हाण, जनरल मॅनेजर अमोल कोंडे आणि वरिष्ठ मुख्याध्यापिका उमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्या रचना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मुख्याध्यापिका उमा पाटील, शिक्षकवृंद तसेच पोदार प्रेप आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. जम्बोज् आयुर्वेद अ‍ॅडव्हेंचर’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित केले. आकर्षक वेशभूषा, चिमुकल्यांचा आत्मविश्वास आणि रंगतदार सादरीकरण यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला पालकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच भारतीय संस्कृती, आरोग्यविषयक जागरूकता आणि निरोगी जीवनशैलीचे संस्कार रुजविण्याचा संदेश या स्नेहसंमेलनातून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.