Nashik Crime: सटाण्यात कॉफी शॉपवर पोलिसांची कारवाई; मालकांवर गुन्हे दाखल

Crime
Crimeesakal
Updated on

सटाणा : कॉफी शॉपच्या नावाखाली युवक- युवतींना अश्लील चाळे करण्यासाठी छोटेखानी कॅबिन उपलब्ध करून देणाऱ्या शहरातील पाच कॉफी शॉपवर पोलिसांनी गुरुवारी (ता.२) रोजी अचानक छापा टाकला.

यावेळी महाविद्यालयाला दांडी मारून कॉफी शॉपचा आस्वाद घेणाऱ्‍या तरुण-तरुणींना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवत पालकांच्या ताब्यात दिले.

तर कॉफी शॉप मालकांवर गुन्हे दाखल केले दरम्यान, सामान्य नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. (Police action on Satane coffee shop Cases filed against owners at satana Nashik Crime)

काही वर्षांपासून शहरातील विविध भागात कॉफी शॉपचा सुळसुळाट झाला आहे. स्वतंत्रपणे बसण्यासाठी व्यवस्था केल्याने कॉपी शॉपमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींची गर्दी असते.

ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवक-युवती सकाळी महाविद्यालयाच्या नावाने घराबाहेर पडतात आणि महाविद्यालयाला दांडी मारून शहरातील कॉफी शॉपवर आपल्या मित्र, मैत्रिणी बरोबर वेळ घालवत असल्याची माहिती सटाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप रणदिवे यांना मिळाली.

श्री.रणदिवे यांनी साध्या वेशात सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंग राजपुत व महिला पोलिस उपनिरीक्षक विजया पवार यांना प्रत्यक्ष कॉफी शॉपवर जाऊन याची खातरजमा करण्याचे आदेश दिले होते.

त्याच अनुषंगाने काही कॉफी शॉपमध्ये अंधारमय वातावरण निर्माण करून तरुण-तरुणींना प्रायव्हसी दिली जात होती. तर कॉफीच्या बहाण्याने अश्लील चाळेही सुरू असल्याचे प्रकार सुरु असल्याची देखील पोलिसांना आढळून आले.

Crime
Kolhapur Crime : धक्कादायक! दारूसाठी पोटच्या पोरानं घोटला आईचा गळा; चेहऱ्यावर जखमा, कानातून आलं रक्त

त्यानंतर सकाळी शहरातील पाच कॉफी शॉपवर पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांना पाहताच कॉफी शॉपमधील तरुण-तरुणींची चांगलीच धावपळ उडाली.

एकांताचा फायदा घेत मौजमस्ती करणाऱ्‍या महाविद्यालयीन युवक-युवतींची कानउघाडणी करीत पोलिसांनी सर्वांना चांगलीच अद्दल घडवली. यानंतर या युवक-युवतींची पोलीस ठाण्यात चांगलीच हजेरी घेऊन कानउघाडणी करीत त्यांना पालकांच्या स्वाधीन केले.

दरम्यान, शहरातील ५ कॉफी शॉपवर एकाचवेळी धडक कारवाई केल्याने महाविद्यालयीन तरुणांमध्ये खळबळ उडाली त्यांना चांगलीच धडकी भरली आहे.

पोलिसांनी संबंधित कॉफी शॉप मालकांवर गुन्हे दाखल केले असून या कारवाईत पोलिस नाईक बाळासाहेब निरभवणे, नितीन जगताप, सविता कावळे, योगेश साळुंके, कैलास घरटे, श्री.चव्हाण, श्री.सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

Crime
Dhule Bribe Crime : मंडल अधिकारी मुकेश भावसारला 2 हजारांची लाच घेताना पकडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.