ॲंकर
NSK26H33246
जळगाव : रायफल हाताळताना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी. सोबत जिल्हाधिकारी राेहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे.
---
NSK26H33247 : शस्त्र प्रदर्शनात सहभागी शालेय विद्यार्थी.
---
जिल्हा न्यायाधीशांनी हाताळली रायफल
पोलिस स्मृती दिनानिमित्त पोलिस दलाचे शस्त्रप्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : पोलिस स्मृती दिनानिमित्त दलातर्फे आधुनिक शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनीही या प्रदर्शनातील शस्त्रांना कौतुकाने हाताळून शास्त्रीय माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात शहरातील विविध
शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
जिल्हा पोलिस दलाच्यावतीने पोलिस कवायत मैदानावर शस्त्र, श्वान, बॉम्ब शोधक व नाशक, पोलिस बँड, वायरलेस आदींचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, उपअधीक्षक (गृह) संजय गायकवाड, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन आदी उपस्थित होते. विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, एनसीसी व एनएसएसचे कॅडेट यांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.