Crime
sakal
नाशिक रोड: नाशिक रोड पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना गुप्त बातमी मिळाली होती की, उपनगर पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील संशयित रोहित ऊर्फ माल्ये गोविंद डिंगम (२९, रा. जयभवानी रोड, फर्नांडिसवाडी) हा गोरेवाडीतील महापालिका शाळेजवळ गावठी कट्टा विकण्यासाठी येणार आहे.