नाशिक: गेल्या जानेवारीमध्ये कालना पोलिसांच्या (पश्चिम बंगाल) तावडीत असताना पसार झालेला संशयित काही महिन्यांपासून नाशिकमध्ये वास्तव्याला होता. त्याला शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने सोमवारी (ता.४) त्र्यंबक रोडवरील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतून शिताफीने पाठलाग करीत अटक केली आहे. त्यास मंगळवारी (ता.५) कालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.