Sandeep Karnik
sakal
नाशिक: नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारीविरोधात उचलेले पाऊल राज्यात ‘फेमस’ होत आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळताना ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ या घोषवाक्याचा स्वत:हून ‘जप’ करतानाचे गुन्हेगारांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचेच अनुकरण करत पुण्यात गुन्हेगाराने चुकीची माफी मागत पुणे पोलिसांनी ‘कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल’ असे घोषवाक्य जारी करीत गुन्हेगारांचा सूचक इशारा दिला आहे.