नाशिक- शहर पोलिस आयुक्तालयास अजून तीन सहायक आयुक्तांची गरज आहे. अधिकारी नसल्याने उपलब्ध सहायक आयुक्तांवर कामाचा अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून शहर आयुक्तालयातील सहायक आयुक्तांची पदे पूर्ण क्षमतेने भरण्यात आलेली नाहीत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालयात आठही सहायक आयुक्तांची आवश्यकता लागेल.