नाशिक- शहर पोलिस आयुक्तालयाच्या शहर गुन्हे शाखा आणि मुख्यालयाच्या उपायुक्तांच्या बदल्या झाल्याने रिक्त झालेल्या दोन जागांसाठी नव्याने दोन उपायुक्त एक-दोन दिवसांत रुजू होतील. मात्र, आयुक्तालयातील महत्त्वाच्या असलेल्या शहर गुन्हे शाखेचे उपायुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, तसेच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक कोणाकडे शहर गुन्हे शाखेची जबाबदारी सोपविणार याचीच चर्चा शहर पोलिस वर्तुळात सध्या आहे.