नाशिक- गहाण ठेवलेली दुचाकी परत देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला पाहून पसार झालेल्या हवालदाराला अखेर अटक करण्यात आली. बुधवारी (ता. २३) घोटी पोलिस ठाण्याच्या आवारातून त्याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.