नाशिक: आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी राज्यभर ‘डायल ११२’ ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत डायल ११२ ला कॉल केल्यानंतर अवघ्या पाचव्या मिनिटाच्या आत पोलिस घटनास्थळी दाखल होत आहेत. २०२४ च्या सुरवातीला ७.४६ मिनिटांपर्यंत असलेला ‘रिस्पॉन्स टाइम’ आता सरासरी ४.५९ मिनिटांपर्यंत आला आहे.