चाळीसगावच्या त्या चार पोलिसांवर खटला चालणार !

चाळीसगावच्या त्या चार पोलिसांवर खटला चालणार !
Published on: 
चाळीसगावच्या ‘त्या’ चार पोलिसांवर चालणार खटला ५० लाखांचा विमा हडपण्याचा डाव फसला सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : आजारपणामुळे मृत्यू झालेल्या ग्रामस्थाचा मृत्यू हा अपघाती मृत्यू असल्याचे भासवून तब्बल ५० लाख रुपयांची विमा रक्कम हडपण्याचा कट उघडकीस आला होता. चाळीसगाव पोलिसांत दाखल या गुन्ह्यात चौघा पोलिसांचा समावेश आढळून आला. या गंभीर प्रकरणात त्या चार पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटला चालविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ग्रामस्थाचा आजाराने मृत्यू झाला होता. मात्र, विम्याची ५० लाख रुपयांची मोठी रक्कम लाटण्याच्या उद्देशाने संबंधित व्यक्तीचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. तपासादरम्यान या संपूर्ण कटात मृताची पत्नी, भाऊ, एक वैद्यकीय अधिकारी, विमा एजंट यांच्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. यांच्यावर चालणार खटला या प्रकरणी पोलिस कर्मचारी रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, सुनील निकम आणि महेंद्र पाटील यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटला चालविण्यास शासनाने परवानगी दिली आहे. चौकट असा आढळला बनाव मृताच्या फोटोवर असलेल्या मृत्यूच्या तारखेमुळे हा संपूर्ण बनाव उघडकीस आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तपासात संशयितांचा ५० लाखांचा विमा हडपण्याचा हा मोठा डाव अखेर फसला. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.