पोलीस हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली

पोलीस हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली
Published on: 
टुडे एक ॲंकर --- NSK26H33220 NSK26H33221 (दाेन्ही फाेटाे क्लब करा) जळगाव : शहिद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करताना जिल्‍हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी, जिल्‍हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे --- पोलिस हुतात्म्यांच्या शौर्याचे स्मरण जिल्हा पोलिस दलातर्फे स्मृतिदिन संचलन; कुटुंबीयांचा गौरव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२१ : कर्तव्य बजावताना देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर पोलिस, सेनेसह हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा पोलिस दलातर्फे बुधवारी (ता. २१) पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातील हुतात्मा स्मारक येथे पोलिस स्मृतीदिन संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, उपअधीक्षक (गृह) संजय गायकवाड आदी उपस्थित होते. देशाची अंतर्गत सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या शौर्याची, त्यागाची आणि कर्तव्यनिष्ठेची आठवण यावेळी जागविण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शहीद परिवारांच्या कुटूंबीयांना सन्मानित करण्यात आले. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com