नाशिक रोड- नाशिक रोडमध्ये सध्या गॅस रिफिलिंगचा धंदा जोरात सुरू आहे. चारचाकी आणि दुचाकी गाड्यांमध्ये घरात वापरायच्या सिलिंडरमधून थेट गाड्यांमध्ये भरला जातो आहे. उच्च जोखीमेचा हा धंदा सध्या नाशिक रोडमध्ये अनेक ठिकाणी सुरू आहे..घरगुती गॅस थेट गाड्यांमध्येनाशिक रोडला सध्या घरगुती गॅस थेट गाड्यांमध्ये भरून दिला जात आहे. विशेष करून कॅनॉल रोड जियाउद्दीन डेपोच्या आसपासचा परिसर, राजवाडा, देवळाली गाव, गोरेवाडी या परिसरामध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर थाटला आहे. रात्री दहानंतर हे व्यवसाय जोमात चालतात. पोलिसांनी या व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. घरचा गॅस गाडीत भरताना मोठी दुर्घटना होऊ शकते..जुगाऱ्यांचे वाढते प्रमाणनाशिक रोड परिसरात दिवसाढवळ्या जुगार खेळली जाते. उड्डाणपुलाखाली रिक्षावाले, टेम्पोवाले उघड्यावर जुगार खेळतात. रेल्वेस्थानकाच्या आसपासचा परिसर, तसेच सिन्नर फाटा येथे जुगाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे..पेट्रोलिंग वाढवाविशेष करून रात्रीच्या वेळी नाशिक रोडच्या आसपासचा ग्रामीण परिसरात पेट्रोलिंग वाढविण्याची आवश्यकता आहे. सिन्नर फाटा, राजवाडा कॅनल रोडची आम्रपाली, दसक पंचक नदीच्या आसपासच्या परिसरात गुन्हेगारांचा रात्रीच्या वेळी वावर असतो. या ठिकाणी पेट्रोलिंग वाढविल्यास गुन्हेगारांना जरब बसू शकतो. संबंधित भागात पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे..सव्वादोन लाखांची चोरीनिफाड, पिंपळगाव रस्त्यावरील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेजारी असणाऱ्या देशी दारू दुकानात दारूच्या बॉटलसह रोख रक्कम असा एकूण दोन लाख ३९ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. देशी दारू दुकानाचे मालक तन्वीर राजे यांनी, चोरट्याने देशी दारू दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून ८६ हजार ६६० रूपये तसेत ७० हजार ७३० रूपयांच्या दारूच्या बॉटल आणि ८२ हजार ६०० रुपये रोख असा एकूण २ लाख ३९ हजार ९९० मुद्देमाल चोरी झाल्याची फिर्याद दिली. पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. प्रभारी पोलिस निरीक्षक गणेश गुरव तपास करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.