नाशिक- नववर्षातील पहिला सण गुढी पाढवा रविवारी (ता. ३०) आणि सोमवारी (ता. ३१) मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद असे दोन सण येत आहेत. तर ७ एप्रिलला श्रीराम नवमी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रोजी आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क असून, कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.