Nashik Police: नाशिक परिक्षेत्रातील तळीरामांना पोलिसांचा दणका! ‘थर्टी-फस्ट’ भोवला; जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई

परिक्षेत्रात सर्वाधिक कारवाई जळगाव जिल्ह्यात तळीरामांवर करण्यात आली आहे
Police raid drunkards in Nashik area
Police raid drunkards in Nashik areaesakal

नाशिक : मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करणाऱ्या तळीरामांना मद्यपान करणे चांगलेच भोवले आहे. नाशिक परिक्षेत्रात ३०, ३१ डिसेंबर रोजी चोख नाकाबंदी करीत पोलिसांनी तळीरामांवर ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई करीत तब्बल साडेपाच लाखांचा दंड वसुल केला आहे.

परिक्षेत्रात सर्वाधिक कारवाई जळगाव जिल्ह्यात तळीरामांवर करण्यात आली आहे. (Police raid drunkards in Nashik area Most action in Jalgaon district on new years eve Nashik)

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयात करण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये २२ तळीरामांविरोधात ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली होती.

याच अनुषंगाने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीणसह जळगाव, धुळे, नंदूरबार, अहमदनगर या जिल्ह्यांतही नाकाबंदी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते.

त्यानुसार परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये मावळत्या वर्षाच्या पूर्वसंध्येपासून नववर्षाच्या पहाटेपर्यंत चोख नाकाबंदी करीत ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली.

त्यानुसार, परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांचे अधीक्षक, अपर अधीक्षकांच्या पथकांनी परिक्षेत्रातील ३७२ ठिकाणी नाकाबंदी या काळात केली होती.

या नाकाबंदीमध्ये ११ हजार ७६१ वाहनांची तपासणी करण्यात येऊन, ५ लाख २६ हजार ९०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

तर या कारवाईमध्ये ५५९ तळीरामांविरोधात ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचे गुन्हे दाखल करीत दंड वसुल करण्यात आला आहे.

सर्वाधिक जळगावात

नाशिक परिक्षेत्रामध्ये ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या सर्वाधिक जळगाव जिल्ह्यात १६४ तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक अपघातांचे प्रमाण नाशिक परिक्षेत्रात आहे.

त्यातही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचेच प्रकार अधिक अधिक असल्याने असे अपघात टाळण्यासाठी परिक्षेत्रात सातत्याने नाकाबंदी करीत कारवाई करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्र कार्यालयाने जारी केले आहेत.

Police raid drunkards in Nashik area
Nashik Truck Drivers Strike: अखेर तोडगा निघाला! नाशिकमध्ये टँकर चालकांचा संप मागे; इंधन पुरवठा होणार सुरळीत..

जिल्हानिहाय नाकाबंदी

नाशिक ग्रामीण - १०१

जळगाव - १०२

धुळे - ५८

अहमदनगर - ६८

नंदूरबार - ४३

ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई

नाशिक ग्रामीण - ४४

जळगाव - १६४

धुळे - १०३

अहमदनगर - १५५

नंदूरबार - ९३

दंडात्मक वसुली

जिल्हा...कारवाई .... वसुल दंड

नाशिक ग्रामीण.... १२१ .... ६८,३०० रुपये

जळगाव....६०३ .....३, ३९,३०० रुपये

धुळे....१७६ .....७८,३०० रुपये

अहमदनगर..... ८० ..... ४१,००० रुपये

नंदूरबार ......००..... ००

"नाशिक परिक्षेत्रातील अपघाताचे प्रमाण पाहता सातत्याने नाकाबंदी करीत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अपघातांना आळा बसू शकेल. "- बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र

Police raid drunkards in Nashik area
Nashik Police: थर्टी-फस्टचा ‘फिव्हर’ पोलिसांनी उतरविला! 336 बेशिस्तांवर कारवाई; हातगाड्या बंद केल्याचा परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com