नाशिक- शहरात आडोशाला उघड्यावर सुरू असलेल्या जुगारअड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकत कारवाईचा बडगा उगारला आहे. नाशिक रोड आणि पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावरील थाटलेल्या जुगारअड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकत गुन्हे दाखल केले आहेत. .पंचवटीतील दिंडोरी नाक्यावरील टॅक्सी स्टॅण्डच्या बाजूला आडोशाला मोकळी जागा आहे. त्याठिकाणी शनिवारी (ता. १०) ‘अंदर-बाहर’ जुगार खेळला जात असल्याची खबर पंचवटी पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने रात्री आठच्या सुमारास छापा टाकला. त्या वेळी विजय सुकदेव जाधव (वय ३२, रा. राहुलवाडी, पेठ रोड), प्रवीण राजाराम राठोड (६४, रा. तेलंगवाडी, पंचवटी) हे जुगार खेळविताना मिळून आले. .दोघांना अटक केली असून, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अंमलदार अंकुश काळे यांच्या फिर्यादीनुसार, पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नाशिक रोड पोलिस ठाण्याचे अंमलदार महेंद्र जाधव यांच्या फिर्यादीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील पुलाखाली मोकळ्या जागेत अंदर-बाहर जुगारअड्डा सुरू असल्याची खबर मिळाली असता, पोलिसांनी छापा टाकला. .Rahuri: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास अटक, 'इन्स्टाग्रामवर झाली ओळख', बळजबरीने दुचाकीवर बसवलं अन् नेमंक काय घडलं?.त्या वेळी संशयित जाकिर हुसेन शेख (वय ६०, रा. देवळालीगाव), सुरेश बाबूराव दुर्जंड (६५, रा. बेलतगव्हाण, नाशिक रोड), शिवाजी वाळू कडभाने (५९, रा. बनकर मळा, चेहेडी शिव), बाळू भगत भोसले (६०, रा. केळकरवाडी, सिन्नर फाटा), रफिक शहा महम्मद मन्सुरी (६१, रा. चेहेडी) हे ५२ पानी पत्त्यावर अंदर-बाहर जुगार खेळताना मिळून आले. त्यांची झडती घेत आठशे रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.