जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ६८ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त

crime
crimecrime

नाशिक रोड : जेल रोड येथील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करून रोख रक्कमेसह ६८ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून २७ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Panday) यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्याबरोबरच अवैध धंद्याकडे लक्ष केंद्रित केले असून, त्याअनुषंगाने त्यांनी अधिकाऱ्यांना कारवाईबाबत आदेशित केले आहे. (Police raided the gambling den In Nashik)

जेल रोड येथे मंगळवारी (ता. २१) सकाळी कैलासजी हाउसिंग सोसायटी पाण्याच्या टाकीसमोर सतीश रघुनाथ भालेराव हा बंदिस्त फ्लॅटमध्ये अवैधरीत्या जुगार खेळवत असल्याची गुप्त माहिती मिळाली. याअनुषंगाने पोलिस आयुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या वेळी २७ इसम जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले. या कारवाईत ५ चारचाकी वाहने व बुलेट दुचाकी, तसेच रोख रक्कम, असे सुमारे ६८ लाख ९२ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, २७ जुगाऱ्याना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी दिली. निवासी इमारतीमध्ये अवैध जुगार अड्डा सुरू केल्याने सदर फ्लॅटचा भोगवटा रद्द होण्याबाबत तसेच पाणी, वीज कनेक्शन कट करण्यासाठी संबंधित विभागाशी पत्र व्यवहार केल्याचेही पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. लोंढे करीत आहेत.

crime
TATA कंपनीकडून नाशिक महापालिकेला मदतीचा हात
crime
एक लिटर पेट्रोलमध्ये धावतात 26 किमी; पाहा देशातील टॉप मायलेज कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com