Nashik News : पोलिस भरतीत 40 टक्के तरुणांची दांडी आजअखेर साडेपाच हजार उमेदवार पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Recruitment News

Nashik News : पोलिस भरतीत 40 टक्के तरुणांची दांडी आजअखेर साडेपाच हजार उमेदवार पात्र

नाशिक : महाराष्ट्र पोलिस दलात शिपाई व चालक पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे. तब्बल तीन-साडेतीन वर्षांनंतर होत असलेल्या या भरतीकडे मात्र सरासरी ४० टक्के तरुणांनी मैदानी चाचणीला दांडी मारल्याचे चित्र आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस भरतीसाठीही दररोज सरासरी ३५ ते ४० टक्के उमेदवारांची अनुपस्थिती असून, आत्तापर्यंत ५ हजार ५२९ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यात १ हजार २२ उमेदवार हे पोलिस चालक पदासाठीचे आहेत.

दरम्यान, पोलिस महासंचालक कार्यालयाकडून अद्याप लेखी परीक्षेसाठीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, एका पदामागे १० उमेदवार असे प्रमाण लेखी परीक्षेसाठी राहण्याची शक्यता आहे. (Police recruitment 40 percent youngsters absent today and five and half thousand eligible nashik news)

हेही वाचा: Nashik News : विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राचे विस्तारीकरण; सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी

राज्यभरात महाराष्ट्र पोलिस दलासाठीची पोलिस शिपाई आणि पोलिस वाहन चालक या पदासाठीची भरती प्रक्रिया गेल्या २ जानेवारीपासून सुरू आहे. तब्बल तीन-साडेतीन वर्षांनी होत असलेल्या या भरतीसाठी राज्यभरातून लाखो तरुणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १६४ पोलिस शिपाई आणि १५ वाहन चालक अशा १७९ जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे. २, ३ जानेवारी रोजी वाहनचालक पदासाठीची मैदानी चाचणी पार पडली असून, यातून १ हजार २२ उमेदवार पात्र ठरले आहेत. तर, ४ जानेवारीपासून पोलिस शिपाई पदासाठीची मैदानी चाचणी आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू आहे.

पोलिस भरतीप्रक्रियेत मैदानी चाचणीसाठी सरासरी ४० टक्के उमेदवारी दांडी मारत असून, आतापर्यंत ६५ टक्के उमेदवारांनी चाचणी दिली आहे. दररोज मैदानी चाचणीसाठी १३०० ते १४०० उमेदवारांना पाचारण केले जात आहे. परंतु, यापैकी ३५ ते ४० टक्के उमेदवार अनुपस्थित राहत आहेत. मंगळवारी (ता. १०) १४०० पैकी सुमारे ९३० उमेदवारांनी उपस्थिती लावली तर, ८१२ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरलेले आहेत.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Nashik News : मालेगावात डीके काॅर्नर भागातील दाम्पत्याची आत्महत्या

‘लेखी’ला लागणार ‘कसोटी’

पोलिस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेसाठीची तारीख अद्याप पोलिस महासंचालक कार्यालयाकडून निश्‍चित करण्यात आलेली नाही. मात्र, रिक्तपदांनुसार, एका पदासाठी १० उमेदवार असे प्रमाण लेखी परीक्षेसाठी राहील, अशी शक्यता आहे. त्यानुसार, नाशिक ग्रामीणच्या १७९ पदांसाठी सुमारे अडीच ते तीन हजार उमेदवार लेखी परीक्षेसाठी असतील. त्यामुळे उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी चांगलीच कसोटी लागणार आहे.

तारखेनिहाय पात्र उमेदवार

२ जानेवारी : ४५२ (चालक)

३ जानेवारी : ५७० (चालक)

४ जानेवारी : ६७७

५ जानेवारी : ७५९

६ जानेवारी : ७१२

७ जानेवारी : ७५९

९ जानेवारी : ७८८

१० जानेवारी : ८१२

एकूण : ५५२९

हेही वाचा: Nashik News : मालेगावात डीके काॅर्नर भागातील दाम्पत्याची आत्महत्या