Latest Marathi News | पोलिस भरतीचे Server Down; दोन दिवसांवर अंतिम मुदतीमुळे उमेदवारांना मनस्ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Bharti

Nashik News : पोलिस भरतीचे Server Down; दोन दिवसांवर अंतिम मुदतीमुळे उमेदवारांना मनस्ताप

नाशिक : अनेक वर्षांनी होऊ घातलेल्या महाराष्ट्र पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून ‘सर्व्हर डाऊन’ चा अडथळा निर्माण झाला आहे.

भरतीसाठी येत्या ३० तारखेपर्यंत अखेरची मुदत असल्याने अंतिम टप्प्यात उमेदवारांची धावाधाव सुरू आहेत. मात्र, वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने उमेदवारांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

महाराष्ट्र पोलिस दलासाठी गेल्या २०१९ पासून भरती प्रक्रिया होऊ शकलेली नाही. त्यामुळे राज्यभरातून पोलिस भरतीसाठी तगादा लावला जात होता. तीन वर्षांनंतर पोलिस भरती प्रक्रियेला राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला. (Police Recruitment form last date And Technical Problem in form uploading server down continuously Umedwar Upset Nashik News pvc99)

हेही वाचा: Nashik News : निफाडच्या संगमेश्‍वर महादेव मंदिर परिसरात तरुणांची काकसेवा!

यात राज्यात सुमारे १५ हजार रिक्त जागांसाठी तर नाशिक ग्रामीण पोलिस दलासाठी १६४ पोलिस शिपाई आणि १५ वाहन चालक पदासाठी भरतीची प्रक्रिया होत आहे. त्यासाठी उमेदवारांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आहे.

त्यासाठी आता अवघे तीन दिवसच राहिलेले असल्याने उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धावाधाव सुरू आहे. मात्र त्यातच, गेल्या दोन-तीन दिवसांपासून भरती प्रक्रिया राबविणाऱ्या ‘महाआयटी’ संस्थेचे सर्व्हर डाऊनच्या समस्येने उमेदवार हैराण झाले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या संकेतस्थळ सुरू होत नाही. सुरू झाले तर पेमेंट स्वीकारले जात नाही या समस्यांमुळे उमेदवारांना मनस्ताप होतो आहे. त्यामुळे गृह विभागाने अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Nashik News : अभोण्याला उमाबाई दाभाडेंच्या कर्तृत्वाचे ‘कोंदण’

उमेदवारांना मनस्ताप

पोलिस भरती प्रक्रियेसाठी www.policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. सध्या संकेतस्थळावर ‘द सर्व्हिस इज अनअव्हेलेबल’ असा संदेश येतो. संकेतस्थळ सुरू झालेच तर, शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. वारंवार असेच होत असल्याने उमेदवार हैराण होत आहेत. पोलिसांच्या हेल्पलाइनवर उमेदवार संपर्क साधतात परंतु त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने मनस्तापात आणखीच भर पडत आहे.

हेही वाचा: Nashik News : महिलांनी शेतमालाच्या Marketingसह प्रक्रिया उद्योग व्यवस्थापन घ्यावे जाणून