पोलीस भरती Non Creamy Layer प्रमाणपत्राची तारीख ठरली डोखेदुखी!; लाखो उमेदवार भरतीतून बाद

Police Recruitment
Police Recruitmentesakal

नाशिक : 8 नोव्हेंबर रोजी शासनाने पोलिस भरतीचे परिपत्रक जाहीर झाले गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या पोलीस भरतीला गती मिळाली. जवळपास 18331 पदाची महाभरती पक्रिया सुरू झाल्याने तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु 8 नोव्हेंबरच्या परिपत्रकामुळे तरुणांचे स्वप्नं भंग पावण्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे तरुणाईकडून पोलीस भरतीच्या नियमाबद्दल नाराजीचा सुर आहे. शासनाने भरतीसाठी कागदपत्राची यादी दिली ज्यामध्ये नॉनक्रिमिलेअर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 याच वित्तीय वर्षांतील असावे.अशी अट घातली. (Police Recruitment Non Creamy Layer Certificate Date issue Lakhs of candidates dropped from recruitment Nashik News)

2021 हे कोरोना वर्ष होते.या काळात स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत .त्यामुळे लाखो तरूणांनी नॉनक्रिमीलेअर काढले नाहीत.शिवाय 2019 वर्षात ज्याची वयोमर्यदा संपलेली होती.त्याना शासनाने 8 दिवसापूर्वी 3 वर्ष वय वाढवून दिले .मग या उमेदवारकांनी वय संपल्यानंतर कोणत्या कारणावस्त प्रमाणपत्र काढावे. अशी सरकारची इच्छा होती नोव्हेंबर 2022 मध्ये त्याना वय वाढवून मिळाले त्यामुळे निश्चितच त्या सर्वांनी आतच या महिन्यात प्रमाणपत्र व कागदाची जमवाजमव केली आहे.

जर यात बदल झाला नाही तर वय वाढवून देण्याचा उपयोग काय ? किंवा कोरोना काळात संचारबंदी असताना सर्वांनी कागदपत्राची पूर्तता कशी करावी? नव्याने भरतीस पात्र उमेदवाराचे काय?असे अनेक प्रश्न तरुणांना भेडसावत आहेत. दरवर्षी 10 ते 12 लाख मुलांच्या मोठा आकडा भरतीला उतरतो पैकी 50% उमेदवाराकडे 2021 वित्तीय वर्षांतील नॉनक्रिमीलेअर नाही त्यामुळे आशा मावळल्या आहे.

Police Recruitment
Pest Control Contract in Dispute : अधिकारी- ठेकेदारांच्या विश्रामगृहावरील भेटीने संशयाचे वर्तुळ

"पोलिस भरती 3 वर्षाने होत असून ती मेगाभरती आहे.10-12लाख मुलापैकी 5ते 6 लाख मुलांकडे 2021 वित्तिय वर्षाचे प्रमाणपत्र नाही सरकारकडे व पोलिस भरतीकडे शेवटची आशा म्हणून पाहणाऱ्या तरुणांना सरकारने 2022 वित्तिय वर्षाचे प्रमाणपत्र स्वीकारून दिलासा दयावा .वय वाढवुन मिळालेल्या उमेदवारांची शेवटची संधी हिरावून घेऊ नये"

- किरण सानप, पोलीस भरती मार्गदर्शक

"मी 3 वर्षांपासून भरतीची वाट पाहतोय .नॉनक्रिमीलेअरच्या 2021 वित्तीय वर्षाच्या अटींमुळे माझे स्वप्न भंग पावणार आहे. सरकारने आम्हला दिलासा दयावा."

- सागर केदारे पोलिस भरती उमेदवार

"माझी पहिलीच भरती असून यापूर्वी नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राची गरज न पडल्याने मी मागील वर्षी ते काढले नाही अशा अटीमुळे आमच्या वर अन्याय होणार आहे"

- आश्विनी मराठे पोलीस भरती उमेदवार

"2019 च्या भरती वेळी वय 1 महिन्याने कमी होते यंदा 3 वर्षानंतर भरती जाहीर झाली तर सर्व कागदपत्रे आम्ही आता जमवत आहोत पूर्वी आम्हला त्याची कल्पना नव्हती सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा" - ओम डेर्ले पोलीस भरती उमेदवार

"माझ्यासारख्या शेकडो मुलीकडे 2021 वर्षाचे नॉनक्रिमीलेअर नाही हे सबंध महाराष्ट्रात असेच घडते आहे. आम्हा मुलीचा हा रोजगार सरकारने आमच्याकडून हिरावून घेऊ नये."

- अस्मिता कटारे पोलीस भरती उमेदवार

Police Recruitment
Nashik : विद्यार्थ्यांच्या खात्यावर वस्तूंचे पैसे; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com