नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची पार्श्वभूमी आणि शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणले आहे. यासाठी आयुक्तालयाने सीएसआर निधीतून उपलब्ध झालेल्या शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले असून, ‘सुरक्षित नाशिक’ची संकल्पना पूर्णत्वास येण्यास मदत होणार आहे.