Nashik News : पोलिसांकडून नायलॉन मांजासह दुचाकी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik : Nylon manja seized from the suspect and senior officers, police personnel along with the suspects

Nashik News : पोलिसांकडून नायलॉन मांजासह दुचाकी जप्त

जुने नाशिक : भद्रकाली पोलिसांकडून गुरुवारी (ता.१२) सायंकाळी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करून ७ हजाराचा नायलॉन मांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

अंमलदार फरीद इनामदार यांना रॉयल हेरिटेज येथे एक जण दुचाकीवर बसून नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. (Police seized two wheeler with nylon Manja Nashik News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

हेही वाचा: Nashik Accident News : सिन्नर शिर्डी महामार्गावर बस व ट्रक ची धडक झाल्याने भिषण अपघात

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सोनवणे, वसीम शेख, रवींद्र जाधव, सलीम तडवी, किरण जाधव, फरीद इनामदार यांनी घटनास्थळी दाखल होत खात्री केली.

संशयित सूरज आसाराम उमप (२४, रा. पंचशीलनगर) दुचाकीच्या (एमएच- १५- एफके- ०३४९) माध्यमातून नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत काही अंतरावर त्यास ताब्यात घेतले. चौकशी करत दुचाकीची तपासणी करून ७ हजार ४५० रुपयांचे नॉयलॉन मांजाचे १३ गट्टू हस्तगत केले. याप्रकरणी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: Nashik News : मीनाताई ठाकरे उद्यानात स्वच्छता मोहीम; उद्यानातील खेळण्यांची लवकरच दुरुस्ती!