जुने नाशिक- रंगपंचमी, रमजाननिमित्ताने जुने नाशिक परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील भागात एक दिवस अगोदर मंगळवार (ता. १८)पासूनच अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वांनी शांततेत आणि उत्साहात सण साजरे करावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.