ॲंकर
शहर-जिल्हा टुडे पान तीनसाठी
NSK26H31586
जळगाव : पोलिस उपनिरक्षक शैला पाचपांडेंसह कुटुंबीयांशी संवाद साधताना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे.
--------
NSK26H31587
जळगाव : डॉ. रोहितचे वडील ठाणे अंमलदार विजय नेरकर यांची सांत्वनपर भेट घेताना श्रीकांत धिवरे, राहुल वाघ.
-------------------------------------------------
महिनाभरात दोन पोलिस कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
-----
सात्वनपर भेट देऊन पोलिस अधीक्षकांनी पार पाडली कुटुंबप्रमुखाची जबाबदारी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : भुसावळ शहर पोलिस ठाण्यातील अंमलदार प्रकाश पाचपांडे यांचा एक सप्टेंबरला व पोलिस कर्मचारी विजय नेरकर यांच्या भावी डॉक्टर मुलाचा २१ सप्टेंबरला गुजरातमध्ये अपघाती मृत्यू झाला. या दोन्ही कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत पोलिस अधीक्षकांनी कुटुंबप्रमुखाची जबाबदारी पार पाडली.
अख्ख पोलिस दल एक कुटुंब मानलं जातं आणि या कुटुंबाचे प्रमुख पोलिस अधीक्षक आहेत. कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यासह त्यांच्या सेवा सुविधा खात्याचे प्रमुख म्हणुन वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. प्रत्येक अधिकारी ते चोखपणे बजावतो पण, पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयाची काळजी घेणारे फार थोडेच अधिकारी असतात. पोलिस दलात काम करताना आपल्या कर्मचाऱ्यांना स्वतः कधी सणोत्सव साजरा करता येत नाही. कायदा व सुव्यवस्था सांभाळताना कुटुंबीयांसोबत अपेक्षित वेळ घालविता येत नाही. त्यातही वयोवृद्ध आईवडिलांच्या आजारपणात त्यांची हवी तशी सेवा करता येत नाही. कर्मचारी कमतरता म्हणुन कामाचा अधिकचा भार आपले कर्मचारी उचलून धरतात, याची सर्वस्व जाणीव ठेवून पोलिस दलात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वयक्तिक आयुष्यातल्या अडचणी व समस्या निराकरणाचे काम काही थोडेच अधिकारी करू पाहतात. त्यापैकी एक पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे होत.
सर्वत्र बारीक लक्ष
साहित्यीक बैठक, वन्यजीव अभ्यासक व मुळात संवेदनशील मनाचे श्रीकांत धिवरे यांचे पोलिस कुटूंबीयांसह सामन्य जनमानसावरही बारीक लक्ष असते. कधी उन्हात बसलेला कष्टकरी, भाजीविक्रेता, हॉकर्सची तहान-भूक त्यांना खुणवते, तर कधी डोक्यावर त्यांच्याही सावली हवी म्हणुन त्यांचे प्रयत्न असतात. गेल्या महिन्यात दोन पोलिस कुटुंबांत दोन अपघाती मृत्यूच्या घटना घडल्या. या दोन्ही कुटुंबीयांना भेटून श्री. धिवरे यांनी नुसता धीर दिला असे नाही, तर अख्य पोलिस दल आपल्या दुःखात सहभागी असल्याची जाणीव करून दिली.
---
चौकट
‘त्या’ दोन दुःखद घटना अशा
पहिल्या घटनेत निवृत्त सहायक फौजदार प्रकाश आनंदा पाचपांडे (भुसावळ) यांचा एक सप्टेंबरला दुचाकी अपघातात मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रविवारी (ता.४) पाचपांडे कुटुंबीयांची भेट घेत शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी पाचपांडे यांच्या पत्नी शैला पाचपांडे (निवृत्त उपनिरीक्षक), दोन मुलांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली.
दुसऱ्या घटनेत सहायक फौजदार विजय नेरकर (भुसावळ बाजारपेठ) यांचा मुलगा डॉ. रोहित गुजरात येथे ‘एमबीबीएस’च्या अंतिम वर्षाला होता. २१ सप्टेंबरला त्याचा गुजरात येथे दुचाकी अपघातात मृत्यू झाला. दुःखात असलेल्या नेरकर कुटुंबीयांना रविवारी (ता.४) पोलिस अधीक्षकांनी भेट देत शोकसंवेदना व्यक्त केल्या.