16 माजी नगरसेवकांचे वेट अॅन्ड वॉच; बदलत्या राजकीय घडामोडींचा परिणाम

Politics
Politicsesakal

नाशिक : आगामी महापालिका (NMC) निवडणुकीची तयारी करताना मतदारांचा कल लक्षात घेऊन पक्ष बदलाच्या तयारीत असलेल्या सोळा सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वेटिंगवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यात मागील टर्ममध्ये भाजपकडून निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या अधिक असून, त्याखालोखाल शिवसेनेचे माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

२०१७ मध्ये निवडणुका झालेल्या पंचवार्षिक मुदत मार्च महिन्यात संपुष्टात आली. त्यापूर्वी निवडणुकीची घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या मुद्द्यांवरून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबली. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्य शासनाला ओबीसींचा (OBC) डेटा गोळा करावा लागत असल्याने सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांची पक्ष बदलण्याची मानसिकता आहे. परंतु, निवडणुका लांबत असल्याने प्रवेश निश्चित होत नाही. पक्ष बदलामध्ये भाजपचे सर्वाधिक माजी नगरसेवक कुंपणावर आहेत. सातपूरच्या भाजपच्या एका नगरसेवकाने खासगी कार्यक्रमाला इतर पक्षाचे नेते बोलावून पक्ष बदलाचे संकेत दिले होते. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चार नगरसेवकांना शिवसेनेची खुली ऑफर आजही आहे. फक्त मुहूर्त निश्चित करणे बाकी आहे.

भाजपचे माजी नगरसेवक जसे शिवसेनेच्या गळाला लागले. तसेच, शिवसेनेचे नाशिक रोड भागातील दोन नगरसेवक भाजपमध्ये पक्ष प्रवेशासाठी इच्छुक आहेत. मनसेचे काही नगरसेवक शिवसेनेची चाचपणी करत असताना शिवसेनेतूनच विरोध झाल्याने त्यांनी मनसेत (MNS) थांबणे पसंत केले. त्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर पक्षाला सुगीचे दिवस येतील, अशी धारणा झाल्याने तूर्त बंडाची तलवार म्यान करण्यात आली.

Politics
नाशिक : शिवसैनिकांनी काढली बंडखोरांची अंत्ययात्रा; पहा Photos

राष्ट्रवादीची (NCP) एक महिला माजी नगरसेविका भाजपच्या वाटेवर आहे, तर एक महिला नगरसेविकेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची आहे. एकंदरीत निवडणुका लागू होण्यापूर्वीच हे बदल होणार असताना राज्यातील सत्ता नाट्यात गेल्या सहा दिवसांपासून निर्माण झालेल्या वादळामुळे राजकीय वातावरण बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने कुंपणावर बसलेल्या ते माजी नगरसेवक आता वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आले आहे. राज्यात शिवसेनेच्या (Shiv Sena) फुटीर गटासोबत भाजपची (BJP) सत्ता आल्यास भाजपमधून बाहेर पडणारे माजी नगरसेवक आहे त्या जागेवरच थांबून निवडणूक लढवतील. तर, उलट शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस (Congress) व मनसेकडून भाजपकडे जाण्याचा कल अधिक राहणार आहे.

‘आप' ची वाट बंद

दिल्ली पाठोपाठ पंजाब राज्यात सत्ता मिळाल्यानंतर आम आदमी पक्ष (AAP) राष्ट्रीय राजकारणात पर्याय म्हणून समोर आला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाची उमेदवारी घेण्याच्या तयारीत दहा ते बारा नगरसेवक होते. यात शहरातील एका माजी आमदाराचादेखील समावेश आहे. आम आदमी पक्ष नवीन असल्याने निवडणुकांबरोबरच राष्ट्रीय किंवा राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळेल, या अंदाजाने काहींची बोलणी सुरू होती. परंतु, राज्याच्या राजकारणात अचानक वादळ निर्माण झाल्याने आपची वाट स्वतःहून बंद करून वेट अॅन्ड वॉच भूमिका घेण्यात आली आहे.

Politics
शिवसैनिक आक्रमक : दादा भुसे आणि सुहास कांदेच्या नावाला फासले काळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com