Nashik : अवजड वाहतुकीवरून रंगले राजकारण

Megha Salve, Nitin Salve giving a statement to Police Commissioner Jayant Naiknavare demanding that the traffic of heavy vehicles be stopped.
Megha Salve, Nitin Salve giving a statement to Police Commissioner Jayant Naiknavare demanding that the traffic of heavy vehicles be stopped.esakal

नाशिक : पुणे महामार्गावरील फेम सिनेमा सिग्नल ते टाकळीपर्यंत सुरू असलेल्या अवजड वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ तर झाली आहे. त्या व्यतिरिक्त रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने त्या विरोधात गेल्या दोन दिवसांपासून प्रभाग 16 मध्ये आंदोलने सुरू आहे. स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या आंदोलनाला सर्वपक्षीय नाव दिले असले तरी पोलिस आयुक्तांना स्वतंत्रपणे निवेदने देऊन सर्वच पक्षाकडून जिव्हाळ्याचा प्रश्न हाताळण्यास आम्हीच कसे सक्षम आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न झाला. (Politics on heavy traffic Trying to show strength by making separate statements to nashik police commissioner Nashik Latest Marathi News)

माजी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी शहरातील वाढत्या वाहतुकीवर पर्याय म्हणून पुणे महामार्गाने नाशिक शहरांमध्ये येणारी वाहतूक रिंग रोडमार्गे वळविण्याचा निर्णय घेतला. नाशिक रोडकडून द्वारकाकडे येताना फेम टॉकीज सिनेमाकडून टाकळी गावाकडे वाहतूक वळविण्यात आली आहे. या अवजड वाहनांमुळे सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची वाताहात झाली. अवजड वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होण्याबरोबरच वाहतूक ठप्प होत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

गेल्या काही महिन्यांमध्ये या भागात अवजड वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले त्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा रोष लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. मात्र सर्व पक्षी आंदोलनाच्या बॅनरखाली अवजड वाहतूक वळविण्याची मागणी करताना सर्वच पक्षांनी स्वतःची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला.

Megha Salve, Nitin Salve giving a statement to Police Commissioner Jayant Naiknavare demanding that the traffic of heavy vehicles be stopped.
Bribe Case: कॅटस्‌च्या लाचखोर मेजर मिश्रा, वाडिले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

विशेष म्हणजे काँग्रेस व मनसेकडून पोलिस आयुक्तांना स्वतंत्र निवेदन देऊन सर्वपक्षीय आंदोलनाचा फज्जा उडवण्यात आला. काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र निवेदन देण्यात आले, तर मनसेच्या माजी नगरसेविका मेघा साळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना स्वतंत्र निवेदन देण्यात आले. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वपक्षीय आंदोलनात सहभाग घेतला.

प्रवेश बंद करण्याची मनसेची मागणी

अपघात टाळण्यासाठी दाट रहिवासी भागातील अवजड वाहनांची वाहतूक तत्काळ बंद करावी, असे निवेदन मनसेच्या वतीने माजी नगरसेविका मेघा साळवे, मध्य नाशिक विधानसभेचे अध्यक्ष नितीन साळवे यांनी दिले. या वेळी वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष नीलेश सहाणे, शहर संघटक संजय देवरे, जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, सहकार सेनेचे शहराध्यक्ष विशाल साळवे, तुषार खैरे, स्वप्नील सहाणे, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते

Megha Salve, Nitin Salve giving a statement to Police Commissioner Jayant Naiknavare demanding that the traffic of heavy vehicles be stopped.
Nashik Crime News : कातरवाडी येथील तरुण शेतकऱ्याच्या खूनाचा 48 तासांत छडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com