नाशिक- राज्याच्या मंत्रिमंडळात चंद्रशेखर बावनकुळे यांना स्थान मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदलले जाणार असल्याने भाजपच्या घटनेनुसार मंडल अध्यक्षांपासून सुरू करण्यात आलेली बदलाची प्रक्रिया नाशिक शहराध्यक्ष, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बदलापर्यंत पोचली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पूर्व विधानसभा मतदारसंघाला बुस्ट देत सुनील केदार यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उत्तर नाशिक जिल्हाध्यक्षपदी यतीन कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सुनील बच्छाव यांचे जिल्हाध्यक्षपद कायम ठेवण्यात आले.