Malegaon Market Committee Election : मालेगावला उत्साह अन् शांततेत मतदान; मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष

Queues for voting at Kabra Vidyalaya polling station
Queues for voting at Kabra Vidyalaya polling stationesakal

Malegaon Market Committee Election : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी शुक्रवारी (ता. २८) कुठलाही अनुचित प्रकार अथवा वाद-विवाद न होता शांततेत व मोठ्या उत्साहात मतदान पार पडले.

बाजार समितीच्या ग्रामपंचायत, सोसायटी, व्यापारी व हमाल मापारी या चार गटातील एकूण ४ हजार २१७ पैकी ४ हजार ११९ मतदारांनी चार मतदान केंद्र व बारा बुथवर मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९७.६८ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी ‘सकाळ’ ला सांगितले.

१८ जागांसाठी ४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. शनिवारी (ता.२९) सकाळी आठला मालेगाव-नामपुर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. (Polling in Malegaon with enthusiasm and peace District focus on vote counting Malegaon Market Committee Election nashik news)

येथील बाजार समितीसाठी शिवसेनेचे नेते पालकमंत्री दादा भुसे व शिवसेना (उध्दव ठाकरे) उपनेते अद्वय हिरे या दोघा नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. श्री. भुसे यांचे आपलं पॅनल व श्री. हिरे यांचे कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल अशी लढत रंगली होती.

आज सकाळी आठला चारही मतदान केंद्रांवर मतदानाला श्री. शेळके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात झाली. बहुसंख्य उमेदवारांनी उन्हाचा पारा लक्षात घेता आपापल्या हक्काच्या मतदारांचे मतदान पहिल्या टप्प्यात करुन घेण्यासाठी मतदार राजाकरिता वाहनांची व्यवस्था केली होती.

दुपारी दोनपर्यंतच सहकारी संस्था झोडगे व सहकारी संस्था मालेगाव या दोन केंद्रांवरील मतदान वगळता सगळीकडे ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. सकाळी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या हाेत्या. झोडगे केंद्रावर अखेरच्या वेळेपर्यंत मतदान सुरु होते.

मालेगाव, झोडगे, निमगाव, सौंदाणे या चारही मतदान केंद्रांवर उमेदवार, त्यांचे समर्थक व कटुंबिय पॅनलनिहाय दुतर्फा हात जोडून उभे होते. मतदारांना मतदान चिठ्ठ्या कालच पोहोचल्या होत्या, तरीदेखील मतदान केंद्राबाहेर मतदान चिठ्ठ्या वाटपासाठी मंडप टाकण्यात आले होते.

उन्हापासून बचाव करण्यासाठी समर्थकांना हे मंडप कामी आले. पॅनलचे नेते श्री. भुसे व श्री. हिरे यांनी या केंद्रांवर दुपारनंतर हजेरी लावत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. दोघा पॅनलने बहुमताचा दावा केला आहे. निवडणूक निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Queues for voting at Kabra Vidyalaya polling station
Political News : ढवळाढवळ अन्‌ श्रेयवादाची लढाई! शिंदे गटाच्या भूमिकेमुळे भाजप नेते त्रस्त

सौंदाणे केंद्रांवर शंभर टक्के मतदान

सौंदाणे येथील मतदान केंद्रावर सोसायटी व ग्रामपंचायत अशा दोनही गटात शंभर टक्के मतदान झाले. सौंदाणे केंद्रावर ग्रामपंचायत गटात एकूण १८४ व सोसायटी गटात एकूण २२७ पैकी सर्वच्या सर्व शंभर टक्के मतदान झाले. बाजार समिती गटनिहाय झालेले मतदान असे :

गट - एकूण मतदान - झालेले मतदान

ग्रामपंचायत - १ हजार २३२ - १ हजार २१७

सोसायटी - १ हजार ५८६ - १ हजार ५८४

व्यापारी - १ हजार १२६ - १ हजार ०६१

हमाल / मापारी - २६१ - २५७

--------------------------------------

एकूण - चार गट - ४ हजार २१७ - ४ हजार ११९

'नगर पॅटर्न' चा बोलबाला

समितीच्या निवडणुकीत मतदानात 'नगर पॅटर्न' राबविण्यात आला. यात सोसायटी मतदार संघातील मतदारास एकाच वेळी ४ मतपत्रिका एकदम न देता प्रथम सर्वसाधारण, त्यानंतर महिला, इतर मागास प्रवर्ग आणि शेवटी भटक्या जाती/विमुक्त जमाती या गटांच्या क्रमनिहाय एकानंतर एक मतपत्रिका देण्यात आल्या. प्रत्येक गटाच्या मतपत्रिकेसाठी स्वतंत्र मतदान कक्ष व मतपेटीचा वापर झाला.

याचप्रमाणे ग्रामपंचायत मतदार संघाच्या ३ मतपत्रिका देण्यात आल्या. या प्रक्रियेमुळे मतदारास मतदान करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. अशिक्षित व वयस्कर मतदाराचा गोंधळ होत नाही. प्रत्येक मतदान अधिकारी हा मतपत्रिका मतदारास देतांना त्या मतपत्रिकेवर किती मतदान करावयाचे आहे हे सांगतो.

या प्रक्रियेमुळे मतपत्रिका बाद होण्याचे प्रमाण कमी होते. मतमोजणीच्या वेळी प्रत्येक गटाच्या मतपत्रिका वेगवेगळ्या कराव्या लागत नाही. त्यामुळे वेळ आणि श्रम वाचून निवडणुक निकाल कमी वेळेत जाहीर करता येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी सांगितले.

Queues for voting at Kabra Vidyalaya polling station
Market Committee Election : कधी नव्हे तो आता मतदारांना मिळतोय भाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com