फटाकेमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी

फटाकेमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी
Published on: 
फटाकेमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी माडा, आयएमएचे आवाहन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ६ : फटाकेमुक्त व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन (माडा) व इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. दिवाळी हा आनंद उत्साह आणि प्रकाशाचा सण आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे वायूप्रदूषण ध्वनी प्रदूषण तसेच आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता यंदाची दिवाळी फटाके मुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी. फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दमा व हृदयविकाराचे रुग्ण तसेच इतर गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना श्र्वसनाचे त्रास होऊ शकतात. या सामाजिक व आरोग्य विषयक जनजागृती मोहिमेत नंदुरबारमधील सर्व नागरिक युवक सामाजिक संस्था व व्यापारी बांधवांनी सक्रिय सहभाग घ्यावा. निरोगी समाज प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि आनंदी दिवाळी हा संकल्प करावा, असे आवाहन डॉ. राजेश वळवी, डॉ. राजेश कोळी यांनी केले आहे. कोट------ नंदुरबार जिल्ह्यामध्ये विशेषता शहरांमध्ये फुफूसच्या आजाराचे रूग्ण वाढले आहेत. दमा, टीबी, कॅन्सरचे रूग्ण वाढत आहेत. लहान मुलांना ॲलर्जी, दमाचे प्रमाण जास्त आहे. फटाक्यांच्या धुरामुळे रुग्णांवर गंभीर परिणाम होत असतो. - डॉ. राजेश वळवी, अध्यक्ष, माडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.