धुळे : टुडे पान ४ साठी...
--
फोटो क्रमांक : 34452
निमगूळ (ता. धुळे) : प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करत प्रतिज्ञा घेताना विद्यार्थ्यांसह शिक्षक.
--
निमगूळमध्ये विद्यार्थ्यांकडून
प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प
--
फटाके टाळण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा उत्सव मानला जातो. मात्र, वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा, आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर निमगूळ (ता. धुळे) येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनच्या विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रदूषणमुक्त व आरोग्यदायी दिवाळी साजरी करण्याबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
-
समितीचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फटाक्यांच्या वाढत्या दुष्परिणामांवर माहिती देत फटाके टाळण्याचे आवाहन केले. प्राचार्य एस. एम. भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना फटाक्यांवर होणारा खर्च टाळून त्या वाचलेल्या पैशातून छान पुस्तके खरेदी करणे, खेळणी घेणे, नवीन छंद जोपासणे आणि गरजूंना मदत करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. प्राचार्य भावसार, मुख्याध्यापक उमेश सांगळे, पी. पी. अहिराव, किशोर पिसे, सीमा दराडे, सी. एन. नगराळे, एस. व्ही. भदाने, ए. एन. साळुंखे, एम. एस. अहिरे, एम. एम. देसले, जी. डी. पाटील, सी. ए. पवार आणि पी. बी. साळी आदी उपस्थित होते.