नाशिक: राज्यातील नद्यांमध्ये ५२ टक्के सांडपाणी हे विनाप्रक्रिया सोडले जात आहे. त्यामुळे नद्या प्रदूषित झाल्या असून, भावी पिढ्यांच्या दृष्टीने हे गंभीर संकट आहे. या संकटावर वेळीच मात करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मुंबई-पुण्याची अवस्था पाहता नाशिकचे नुकसान रोखावे, असे आवाहन करताना शहरांमधील गर्दी टाळण्यासाठी गावातच शाश्वत उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.