लासलगाव- लासलगाव-पुणे मार्गावर धावणाऱ्या हिरकणी या लांब पल्ल्याच्या एसटी बसमधील आरक्षित सीट्स तुटलेल्या अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव प्रवाशांनी उघडकीस आणले आहे. लासलगाव एसटी आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.