Nashik News: POP गणेशमूर्ती विकणारच; NMC आयुक्तांची बंदी झुगारून विक्रेत्यांचा निर्धार

Sculptor creating plaster of Paris Ganesha idol.
Sculptor creating plaster of Paris Ganesha idol.esakal

Nashik News : प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्ती विक्रीस महापालिका आयुक्तांकडून बंदी घालण्यात आली आहे. मूर्तिकारांनी मात्र त्यांच्या निर्णयास विरोध केला आहे. शिवाय त्या मूर्तीविक्रीचा निश्चय केला आहे.

तर प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती विकणार नाही, असे कुठल्याही प्रकारचे हमीपत्र महापालिकेस देण्यास नकार असल्याची भूमिका घेतली आहे, अशी माहिती मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष पंकज राऊत यांनी दिली. (POP to sell Ganesha idol Determination of vendors defying NMC Commissioner ban Nashik News)

अवघ्या महिना-दीड महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. मूर्ती कामास वेग आला आहे. काही मूर्तिकरांच्या मूर्ती विक्रीसाठी बुक देखील झाल्या आहेत. सुमारे ९० टक्के मूर्ती तयार झाल्या आहेत.

त्यानंतर आता महापालिका आयुक्तांकडून प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्ती विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. शिवाय अशा प्रकारच्या मूर्ती विकणार नाही, अशा हमीपत्रांची विक्रेत्यांकडून मागणी करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांच्या या निर्णयाचा मूर्तिकार आणि विक्रेत्यांकडून विरोध करण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता अचानक हा निर्णय घेणे मूर्तिकार आणि विक्रेत्यांवर अन्यायकारक आहे.

बंदी घालायची होती तर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात जेव्हा प्रत्यक्षात मूर्तिकामास सुरवात होते त्या वेळेस बंदी आदेश प्रसारित करणे समजू शकले असते. आता अशा प्रकारचे आदेश देणे योग्य नाही. महापालिकेने बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी मूर्तिकार आणि विक्रेत्यांकडून करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sculptor creating plaster of Paris Ganesha idol.
Cultural Policy : नाट्य संस्कृतीचा चेहरा बदलावा; उपनगरांमध्ये व्हावीत छोटी नाट्यगृहे

राज्याच्या निर्णयास महापालिकेचा विरोध

राज्य सरकारकडून यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. असे असताना महापालिका आयुक्तांकडून बंदीचा निर्णय घेणे आश्चर्यकारक आहे. राज्य सरकार मोठे की महापालिका आयुक्त, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार शहरातही प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्ती विक्री परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मूर्तिकार संघटना आणि व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.

"महापालिकेकडून मागणी केलेले कुठल्याही प्रकारचे हमीपत्र व्यावसायिक, तसेच मूर्तिकारांकडून देण्यात येणार नाही. निर्णय मागे घेण्यात आला नाही तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल."- पंकज राऊत, प्रतिकार संघटना अध्यक्ष (टी-शर्ट घातलेला)

"शाडूची मूर्ती तयार करून विक्री करणे न परवडणारे आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीशिवाय पर्याय नाही. बंदी घालायचीच असेल तर प्रथम उपाययोजना करण्यात याव्यात."

- सोनू परदेशी, मूर्तिकार आणि व्यावसायिक (पांढऱ्या लाइनचा शर्ट घातलेला)

Sculptor creating plaster of Paris Ganesha idol.
Monsoon Tourism: शहरात पर्यटकांची मांदियाळी..! बसस्‍थानकावर गर्दी, धार्मिक-निसर्ग पर्यटनाला चालना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com