टपाल सेवांच्या तक्रारींसाठी ५ नोव्हेंबरला डाक अदालत सहा आठवड्यांपासून प्रलंबित तक्रारींची दखल

टपाल सेवांच्या तक्रारींसाठी ५ नोव्हेंबरला डाक अदालत
सहा आठवड्यांपासून प्रलंबित तक्रारींची दखल
Published on: 
टपाल सेवांच्या तक्रारींसाठी ५ नोव्हेंबरला डाक अदालत सहा आठवड्यांपासून प्रलंबित तक्रारींची दखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : टपाल सेवांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जळगाव विभागाच्या अधीक्षक डाकघर कार्यालयातर्फे गुरुवारी (ता. ५) दुपारी चारला डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीत सहा आठवड्यांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार आहे. टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डर आदी सेवांबाबतच्या ज्या तक्रारी दाखल केल्यानंतर सहा आठवड्यांच्या कालावधीत निकाली निघालेल्या नाहीत, अशा तक्रारी डाक अदालतीत मांडता येणार आहेत. संबंधित तक्रारदारांना डाक विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार असून, तक्रारींचे लवकर निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तक्रारदारांनी अर्जामध्ये आपले नाव, पत्ता, तक्रारीचा विषय, तक्रार दाखल केल्याची तारीख तसेच मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आली, त्या अधिकाऱ्याचे नाव व पद नमूद करणे आवश्यक आहे. तक्रारी दोन प्रतींत, अतिरिक्त प्रतीसह पाठवाव्यात. तक्रारी २ नोव्हेंबर २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील, अशा पद्धतीने टी. एफ. तडवी, सहाय्यक अधीक्षक (मुख्यालय), अधीक्षक डाकघर कार्यालय, पहिला मजला, हेड पोस्ट ऑफिस बिल्डिंग, जळगाव ४२५००१ या पत्त्यावर पाठवाव्यात. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल; मात्र त्यांचा डाक अदालत अंतर्गत विचार केला जाणार नाही, असे अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.