जुने नाशिक- शहरातील द्वारका, मुंबई नाकासह विविध भागात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यात अनेक ठिकाणी विविध कामासाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. अशा मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. त्यातच महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या अधिक प्रमाणात भेडसावू नये. यासाठी आत्तापासूनच महापालिकेने नियोजन करत रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करावा. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.