Poultry Business Crisis : वाढत्या उष्णतेचा कुक्कुट पालकांना फटका!

Poultry Affected by Summer Heat
Poultry Affected by Summer Heatesakal

Poultry Business : उन्हाची काहिली वाढू लागल्याचा फटका माणसांप्रमाणेच पशु व पक्षांना देखील बसू लागला आहे. उष्णतेच्या लाटेचा सामना असह्य झाल्याने सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कुक्कुटपालकांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.

चाळीशीच्या घरात गेलेल्या तापमानामुळे कोंबड्यांची मरतुक वाढून पोल्ट्री चालक शेतकरी संकटात सापडला आहे. (Poultry Business Crisis hit by rising heat summer nashik news)

शेतीला पूरक व्यवसायाची जोड म्हणून सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पोल्ट्री व्यवसाय मागील अनेक वर्षांपासून भरभराटीला आला आहे. करार पद्धतीने कोंबड्या सांभाळण्यासाठी घ्यायच्या, दोन ते अडीच किलोच्या दरम्यान वजन झाल्यावर संबंधित कंपन्यांनी त्यांची विक्री केल्यावर सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिपक्षी 25 ते 30 रुपयांपर्यंत मोबदला दिला जातो.

यासाठी पिल्ले आणि खाद्य संबंधित कंपनीकडून पुरवले जाते. व्हॅक्सिनेशन व इतर तपासण्यासाठी कंपनीकडूनच डॉक्टर येतात. त्यामुळे एकूणच फायदेशीर असणाऱ्या या व्यवसायात सिन्नरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी जमा बसवला आहे.

काही शेतकरी स्वतःच पिल्ले व खाद्य, तसेच औषधांवर चा खर्च करून स्वतंत्रपणे पोल्ट्री व्यवसाय चालवत आहे. मांसाहारीकडून खाण्यासाठी मागणी असलेल्या बॉयलर कोंबड्याचा संभाळ या शेतकऱ्यांकडून केला जातो.

तर मागील काही वर्षात अंडी देणाऱ्या लेयर प्रकारातील कोंबड्यांचे फार्म देखील या भागात उभे राहिले आहेत. पावसाळा आणि हिवाळ्याचे दिवस सोडले तर उन्हाळ्यात पक्षांची काळजी घेण्याचे आव्हान या शेतकऱ्यांसमोर नेहमीच असते.

यंदाचा उन्हाळा तुलनेने जास्तच कडक असल्यामुळे त्याचा थेट फटका पोल्ट्री चालक शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून तापमान वाढण्या सोबतच वातावरणातील उष्मादेखील वाढू लागला आहे. त्यामुळे कोंबड्या मरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. एकेका गेल्या आठवड्यात 12 ते 15 कोंबड्या दररोज मृत व्हायच्या.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Poultry Affected by Summer Heat
Nashik News : बिबट्याच्या हल्ल्यातील वाढत्या पशूहानीने चिंता; उंबरपाडा भागात दररोज होतेय दर्शन

हे प्रमाण आज घडीला शंभरी पार गेले आहे. कोंबडीचे वजन एक किलोच्या घरात आल्यानंतर पुढचे अडीच ते तीन आठवडे त्यांची काळजी घ्यावी लागते. या काळात त्यांचा आहार देखील वाढतो. मात्र नेमकी हीच वेळ शेतकऱ्यांचे नुकसान करणारी ठरली आहे.

पक्षी मेल्यानंतर त्याचा फटका संबंधित कंपनी सोबतच शेतकऱ्याला देखील सहन करावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अनेक शेतकरी शेडमध्ये पक्षी टाकण्यास नाखुश असतात. परंतु कंपनी सोबतचे कॉन्ट्रॅक्ट टिकवायचे असल्याने त्यांना नाईलाजाने पक्षी सांभाळावे लागतात.

पोल्ट्री शेडमध्ये उष्णतेचा दाह कोंबड्यांना होऊ नये यासाठी शेडच्या बाजूने कापडी पडदे बांधले जातात व त्यावर पाणी मारून ते ओले ठेवले जातात. शेड मधील जमिनीवर देखील तासा तासाने पाणी शिंपडावे लागते.

ज्यांना शक्य आहे ते शेतकरी मोठे कुलिंग फॅन देखील बसवतात. मात्र त्यासाठी विजेचा खर्च त्यांनाच सोसावा लागतो. काही शेतकऱ्यांनी तर शेडमध्ये स्प्रिंकलर बसवून त्याद्वारे पक्षांवर पाणी शिंपडण्याची देखील व्यवस्था केली आहे.

मात्र हे सर्व उपाय क्षणिक ठरतात. उष्णतेचा दाह झाल्यावर दिवसभर धापा टाकणारा पक्षी सायंकाळच्या वेळेस अचानक गतप्राण होतो.

"माझ्याकडे अंडी देणारे पाच हजार पक्षी आहेत. पोल्ट्री शेडचा परिसर थंड ठेवण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो. मात्र उन्हाचा दाह अधिक असल्याने पक्षांची तब्येत बिघडते. हार्ट अटॅक सारखा प्रकार होऊन पक्षी दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.आठवडाभरापूर्वी आठ दहा कोंबड्या चा मृत्यू व्हायचा. हे प्रमाणात दररोज 30- 40 च्या घरात येऊन पोहोचले आहे."

- रावसाहेब ढमाले, दुशिंगवाडी

Poultry Affected by Summer Heat
Nashik News : इगतपुरीतील ज्येष्ठांच्या लढ्याला यश; काही काळ गोंधळ उडाल्यानंतर उपोषण स्थगित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com