पोल्ट्री नुकसानीचा प्रस्ताव आठ कोटींचा, भरपाई मिळाली पाच कोटींची

पोल्ट्री नुकसानीचा प्रस्ताव आठ कोटींचा, भरपाई मिळाली पाच कोटींची
Published on: 
(टुडे पान एक मेन लिड) पोल्ट्री व्यावसायिकांना पाच कोटींची नुकसानभरपाई उर्वरित रकमेची प्रतीक्षा : ‘बर्ल्ड फ्लू’ मुळे बंद पडलेले पोल्ट्रीफार्म सुरू करण्याच्या हालचाली नंदुरबार, ता. १३ : ‘बर्ल्ड फ्लू’मुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून आतापर्यंत पाच कोटींची भरपाई देण्यात आली आहे. भरपाईची उर्वरित रक्कम मिळण्याची व्यावसायिकांना अद्यापही प्रतीक्षा आहे. दरम्यान, ‘बर्ल्ड फ्लू’मुळे नवापूर तालुक्यातील १४ पोल्ट्रीफार्म बाधित झाले होते. यात व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यानंतर संबंधित पोल्ट्रीफार्म आजपर्यंत बंद आहेत. दरम्यान, या भागातील पोल्ट्री व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा, यासाठी आता प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून, परिसरातील काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर बंद पडलेले सर्व पोल्ट्रीफार्म सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये नवापूर तालुक्यातील डायमंड पोल्ट्री फार्ममध्ये काही कोंबड्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला होता. त्यानंतर परिसरातील चार पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय सुरक्षा पशूरोग संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील तीन नमुने पॉझिटीव्ह आल्याने परिसरातील पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्या, अंडी आणि खाद्य नष्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार चार लाख सहा हजार ६८२ कोंबड्या, २४ लाख ९१ हजार ७२३ अंडी आणि पाच लाख ४८ हजार ९५८ किलोग्रॅम खाद्य नष्ट करण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून तालुक्यातील १४ पोल्ट्रीफार्म आजही बंद आहेत. मोहिमेदरम्यान, केंद्र शासनाच्या आपात्कालीन चिकिस्ता राहत पथकाने नवापुरात भेट देऊन संबंधित विभागाकडून नुकसानीची माहिती घेतली होती. त्यानंतर पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शासनाकडे आठ कोटी सहा लाख २६ हजार ३२२ रुपयांचा प्रस्ताव सादर केलेला होता. त्यातील पाच कोटी १६ लाख ६६ हजार १४६ रुपयांची नुकसानभरपाई संबधित पोल्ट्रीधारकांना वितरीत करण्यात आली आहे. --- बाधित पोल्ट्रीफार्म संख्या - १४ नुकसान भरपाईचा प्रस्ताव - आठ कोटी सहा लाख २६ हजार ३२२ आतापर्यंत प्राप्त रक्कम - पाच कोटी १६ लाख ६६ हजार १४६ प्रतीक्षेत असलेली भरपाई रक्कम - तीन कोटी ४३ लाख ६० हजार १७६ --- (पासपोर्ट फोटो NSK26H32216) कोट ‘बर्ल्ड फ्लू’मुळे नवापूर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला होता. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिकांना वितरीत करण्यात आली आहे. उवरित रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. संबंधित विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच व्यवसाय पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे. - डॉ. संजय खाचणे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com