Nashik News : नाशिक, निफाड, सिन्नरमध्ये आवर्तनावेळी वीज खंडीत होणार!

आवर्तन
Power cut news
Power cut newsesakal

नाशिक : कडवा प्रकल्‍पातून कडवा उजवा कालव्‍यातील सिंचनासाठी नऊशे दशलक्ष घन अुट व पाणी पुरवठा योजनांसाठी बिगर सिंचन १२८ दशलक्ष घरफुट असे एकूण एक हजार ०२९ दशलक्ष घनफुट पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

येत्‍या २३ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत आवर्तन सोडले जाणार असलयाने, आवर्तन मार्गातील नाशिक, निफाड व सिन्नर तालुक्‍यातील काही गावांचा विद्युत पुरवठा दिवसातील बावीस तांसासाठी बंद केला जाणार आहे. यासंदर्भात जिल्‍हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आदेश जारी केले आहेत. (power cut in Nashik Niphad Sinnar during water circulation nashik news)

मंगळवारी जारी केलेल्‍या आदेशानुसार कडवा प्रकल्‍पातून सोडत असलेल्‍या आवर्तन कालावधीत रोज २२ तास विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी सहा ते आठ या वेळेतच नमूद गावांमध्ये विज पुरवठा होणार आहे.

आदेशात नमूद केल्‍यानुसार नाशिक तालुक्‍यातील मौजे शिंदे, दोनवाडे, नाणेगाव, चांदगिरी, व जाखोरी आदी गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित केला जाईल. तर निफाड तालुक्‍यातील मौजे म्‍हाळसाकोरे, भेंडाळी, चाटोरी, बेरवाडी, सोनगाव, करंजगाव, औरंगपूर, भुसे व श्रीरामपूर आदी. सिन्नर तालुक्‍यातील मौजे वडांगळी, किर्तांगळी, हिवरगाव, कोमलवाडी, घंगाळवाडी,

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

Power cut news
Winter Weather Update : वातावरणात गारवा अन् कमाल तापमानात वाढ!

खडांगळी, निमगाव, देवपूर, पंचाळे, उजनी, पिंपळगाव (धनगरवाडी), रामपूर, श्रीरामपूर आदी गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. या गावांमध्ये वीज बंदी करण्यास मान्‍यता देण्याचे आदेश पारीत केलेले आहेत.

आवर्तनातील पिण्याचे पाणी शेवटच्‍या गावापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पाटबंधाहेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....रे विभागाची राहिल. तसेच आवर्तनासाठी नमूद केल्‍याप्रमाणे पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. अतिरिक्‍त पाण्याचे आवर्तन सोडण्यात येऊ नये, असे आदेशात नमूद केलेले आहे.

Power cut news
Dr. Amol Kolhe | शिवपुत्र संभाजी महानाट्याचा ‘तनिष्कां’नी करावा प्रचार- प्रसार : अमोल कोल्हे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com