Nashik News: ‘नाशिक’ची वीजनिर्मिती शून्यावर; क्षमता 9540 वॉट, निर्मिती अवघी 5457

 thermal power station nashik
thermal power station nashik esakal

Nashik News : अवकाळी पावसाने राज्याच्या अनेक भागांत हजेरी लावल्याने विजेची मागणी काहीअंशी कमी झाली. दुसरीकडे नाशिक औष्णिक वीज केंद्रातील निर्मिती शून्यावर आल्याने सेंट्रलकडून एकूण हिश्श्यापैकी १०० ते १५० वॉट वीज जास्तीची उचल करून गरज भागविली जात आहे.

नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच क्र. तीन तांत्रिक बिघाडामुळे बुधवारी (ता. २९) रात्री बंद पडला. संच क्रमांक चारचे वार्षिक देखभालीचे काम २० नोव्हेंबरपासून सुरू आहे. संच पाच बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद पडल्याने नाशिकची निर्मिती शून्यावर आली आहे. (Power generation of Nashik at zero news)

संच तीनचे काम युद्धपातळीवर सुरू असून, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तो प्रज्वलित करण्यात आला असून, रात्री नऊपर्यंत या संचातून निर्मिती सुरू होणे अपेक्षित आहे. संच पाच सुरू होण्यास दोन ते तीन दिवसांचा अवधी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सद्यःस्थितीत पाच संच बंद

राज्याची विजेची मागणी साडेएकवीस हजारांच्या आसपास असताना परळी, चंद्रपूर, भुसावळची निर्मिती क्षमतेपेक्षा निम्म्याने सुरू आहे. यंदा बहुतांश भागात पावसाची सरासरी कमी असल्याने वीजनिर्मितीवर याचा निश्चितच परिणाम होणार आहे.

नाशिकचे तीन संच, भुसावळ एक संच व चंद्रपूरचा एक संच असे पाच संच सद्यःस्थितीत बंद असून, महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रातून पाच हजार ४५७ वॉट, तर वायू व जलविद्युत केंद्र मिळून सहा हजार ३८४ वॉटची वीजनिर्मिती सायंकाळी पाचला सुरू होती.

 thermal power station nashik
Nashik Voter Registration: मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रम; तृतीयपंथी, बेघर, भटक्यांसाठी विशेष शिबिर

खासगीच्या पाच हजार ४०७ वॉटची वीजनिर्मितीही सुरू होती. राज्याची मागणी २१ हजार ४०० वॉट होती. सर्व स्त्रोतातून १२ हजार ८७६ वॉट ती सुरू होती. सेंट्रलकडून आठ हजार ५२० वॉट हिस्सा घेऊन गरज भागवली जात होती.

वीज केंद्र क्षमता निर्मिती

(वॉट)

नाशिक ६३० ०००

कोराडी २१९० १८६६

खापरखेडा १३४० ९१७

पारस ५०० ४२३

परळी ७५० ३९९

चंद्रपूर २९२० १४७०

भुसावळ १२१० ३८२

 thermal power station nashik
NSS Volunteer Subsidy : ‘एनएसएस’ स्‍वयंसेवकांच्‍या अनुदानात वाढ; शिबिर अनुदानही वाढविले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com