पंचवटी- नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्याविरोधात संचालक मंडळाने अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. १८ पैकी १५ सदस्य विद्यमान सभापतींच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. .दरम्यान, प्रस्तावावर चर्चेसाठी येत्या ११ मार्चला सभा होणार असून, यात सभापतिपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्तात पंधरा संचालक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते..नाशिक बाजार समितीत आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट आमनेसामने आहेत. विद्यमान सभापती देवीदास पिंगळे हे अजित पवार राष्ट्रवादीचे आहेत. बाजार समितीवर असलेल्या एकूण १८ सदस्यांपैकी १५ सदस्यांनी श्री. पिंगळेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विशेष म्हणजे हे सर्व सदस्य पिंगळे यांच्यासोबत निवडून आले आहेत. भाजपमध्ये गेलेले माजी सभापती शिवाजी चुंभळे यांची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. .चुंभळे यांनी संचालकांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळविल्याचे बोलले जात आहे. आजपर्यंत चुंभळे विरुद्ध पिंगळे हा सामना सर्वश्रुत आहे, त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले पिंगळे यांना भाजपचे शिवाजी चुंभळे यांनी विरोध दर्शविला आहे. बाजार समितीच्या पंधरा सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पिंगळे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाबाबतचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की देवीदास पिंगळे यांचा कारभार मनमानी असून, त्याविरोधात संचालकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता पिंगळे यांचे सभापतिपद धोक्यात आले आहे. याबाबत नेमके काय होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे..मतदारांनी आम्हाला संचालक केले आणि आम्ही संचालक मंडळाने देवीदास पिंगळे यांना सभापती केले; परंतु बाजार समितीत संचालकांचे कुठलेही काम होत नाही. साधे प्रोसिडिंगसुद्धा बघायला मिळत नाही. केवळ सह्या करायचे आणि निघून जायचे, मग उपयोग काय? बाजार समितीत शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. उपसभापतीला कशाचाही अधिकार नाही. -विनायक माळेकर, उपसभापती, नाशिक बाजार समिती.पिंगळेंविरोधातील संचालकअविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्या १५ संचालकांत उपसभापती विनायक माळेकर, सविता तुंगार, शिवाजी चुंभळे, युवराज कोठुळे, तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, राजाराम धनवटे, भास्कर गावित, जगन्नाथ कटाळे, कल्पना चुंभळे, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील आणि ज्येष्ठ संचालक संपत सकाळे यांचा समावेश आहे..पिंगळेंबरोबर असलेले संचालकसभापती देवीदास पिंगळे यांच्याबरोबर फक्त उत्तमराव खांडबहाले आणि निर्मला कड हे दोन संचालक राहिले आहेत..नाशिक बाजार समितीत शेतकरी व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. शेतकऱ्याला साधे स्वच्छ पाणीही प्यायला मिळत नाही. गेली दोन वर्षे पिंगळे यांच्याकडून मनमानी कारभार सुरू होता. त्याविरोधात आम्ही १८ संचालकांनी भूमिका घेतली आहे. सभापती कोणत्याही संचालकांना विश्वासात घेत नव्हते. त्यामुळे आम्ही एकत्र आलो असून, लवकरच सभापतीबाबत निर्णय होईल.-शिवाजी चुंभळे, माजी सभापती, संचालक.बाजार समितीत सगळी कामे सुरळीत सुरू आहेत; परंतु सध्या जे काही घडत आहे ते सगळे पैशाच्या जोरावर घडत आहे. शिवाजी चुंभळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि हे प्रकार सुरू झाले. मंत्री महाजन यांच्याकडून संचालकांना पैशाचे आमिष दाखविण्यात आले. पोलिस घेऊन संचालक जमा केले आहेत.-देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजार समिती.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.